breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बलात्कारींचा देश अशीच देशाची प्रतिमा: HC

मुंबई : ‘बलात्काराच्या घटना असो किंवा उदारमतवादी व्यक्तींच्या हत्या, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा गुन्हेगार व बलात्कारींचा देश अशीच होत आहे…’ कथुआ व उन्नाव बलात्काराच्या घटनांमुळे समाजमन व्यथित असतानाच मुंबई उच्च न्यायालयानेही गुरुवारी यावर चिंता व्यक्त केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यास सीबीआय आणि महाराष्ट्र एसआयटीला अपयश आल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. ‘आम्ही परदेशात कुठेही गेलो की, आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. या देशात केवळ बलात्कार व गुन्हेगारी घटना घडतात, उदारमतवादी व्यक्ती या देशात सुरक्षित नाहीत, अशी भारताची प्रतिमा परदेशात निर्माण होत आहे. यामुळे आर्थिक गुंतवणूक असो किंवा शैक्षणिक-सांस्कृतिक आदानप्रदान असो, आंतरराष्ट्रीय जगत आपल्याशी संबंध ठेवण्यास बिचकतात. हे अत्यंत खेदजनक व दुर्दैवी आहे’, असे गंभीर निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button