breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बदलीबाबत मला पूर्वकल्पना देण्यात आली होती -न्या. एस. मुरलीधर

नवी दिल्ली | महाईन्यूज

आपल्या बदलीबाबत आपल्याला १७ फेब्रुवारीलाच माहिती देण्यात आली होती आणि आपली त्याबाबत काहीच तक्रार नव्हती, असे सांगून न्या. एस. मुरलीधर यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील यांना पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या बदलीच्या घटनाक्रमाची माहिती दिली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयातील आपल्या निरोप समारंभात न्यायमूर्ती मुरलीधर यांनी सांगितले, की आपली पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्याबाबत न्यायमंडळाने केलेल्या शिफारशीवरून सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे पत्र १७ फेब्रुवारीला आपल्याला मिळाले होते. मी हे पत्र स्वीकारले. माझी दिल्ली उच्च न्यायालयातून बदली करायचीच असेल, तर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात जाण्यात मला काहीच अडचण नसल्याचे उत्तर मी दिले, असे न्या. मुरलीधर यांनी उपस्थितांना सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button