breaking-newsराष्ट्रिय

बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी खड्ड्यात अडकली

बडोदा : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका गुजरातला बसला आहे. राज्यातील वलसाड, सुरत आणि नवसरी जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रमुख शहरांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तर, पावसामुळे झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचेही वृत्त समोर आले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी बडोदा शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यावेळी बडोद्याच्या महापौर डॉ. जिगिशा सेठ यांची गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्यात अडकली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर महापौरांचीच गाडी अडकल्याने शहरातील पावसामुळे पडलेल्या रस्त्यांवरील खड्यांवरुन जोरदार टीका सुरु झाली आहे. महापौरांची गाडी अडकल्याची घटना गेल्या सोमवारी घडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button