breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, हिंगोली येथील धक्कादायक घटना

हिंगोली : वसमत येथील एसटी आगारामधील एका चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अशोक दगडू कळंबे (४५ ) असे त्यांचे नाव असून जानेवारी महिन्यात आंदोलन काळात ते बडतर्फ झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत येथील एसटी आगारामध्ये अशोक कळंबे हे मागील काही वर्षापासून चालक म्हणून कार्यरत होते. वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय जवळ ते कुटुंबीयांसह राहतात. रात्री सात वाजेच्या सुमारास ते बाहेरून फोनवर रागारागाने बोलतच घरात आले. या रागाच्या भरात त्यांनी मोबाइलवरून जमीनीवर आपटून टाकला. मात्र, त्यांचा राग पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विचारणाही केली नाही.
दरम्यान, अशोक यांनी रागाच्या भरात बेडरूममध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. यामध्ये त्यांनी ओढणीची एक बाजू खिडकीच्या गजाला बांधली होती. गळफास घेताच त्यांच्या वजनामुळे ओढणीची गाठ त्यांच्या गळ्याला घट्ट आवळली गेली. तर दुसरीकडे खिडकीच्या गजाला बांधलेले ओढणीची गाठ सुटली आणि ते खाली कोसळले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे, जमादार बालाजी मिरासे, शेख नय्यर, शेख हकीम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अशोक यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. चालक अशोक यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वसमत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनमध्ये अशोक कळंबे यांनी सहभाग घेतला. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाचे निर्देशानुसार त्यांना ता. १३ जानेवारी रोजी बडतर्फही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अपील व कामावर येण्याची संधी देखील देण्यात आली होती. मात्र, ते कामावर आलेच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button