breaking-newsक्रिडा

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप-स्टीफन्स आज विजेतेपदासाठी झुंजणार

पॅरिस – रुमानियाची अग्रमानांकित सिमोना हालेप आणि अमेरिकेची दहावी मानांकित स्लोन स्टीफन्स यांच्यात फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. आज (शनिवार) रंगणाऱ्या या लढतीतून फ्रेंच ओपनला नवी विजेती मिळणार आहे.

हालेपने याआधी 2014 व 2017 मध्ये फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती. तसेच तिने यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु तिला पहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. त्याउलट स्टीफन्सने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना पहिलेवहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले होते.

सिमोना हालेपने उपान्त्य लढतीत स्पेनच्या तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाचे आव्हान 6-1, 6-4 असे मोडून काढत अंतिम फेरीत धडक मारली. तर स्लोन स्टीफन्सने अमेरिकेच्याच तेराव्या मानांकित मॅडिसन कीजचा प्रतिकार 6-4, 6-4 असा संपुष्टात आणताना दुसऱ्यांदा ग्रॅंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

त्याआधी सिमोना हालेपने उपान्त्यपूर्व फेरीत बाराव्या मानांकित अँजेलिक कर्बरची कडवी झुंज तीन सेटमध्ये मोडून काढली होती. तर तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाने रशियाच्या 28व्या मानांकित मारिया शारापोव्हाचा धुव्वा उडविताना दिमाखात उपान्त्य फेरी गाठली होती. मातृत्वाच्या सुटीनंतर परतलेल्या सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर मारिया शारापोव्हाला संधी असल्याचे मानले जात होते. परंतु मुगुरुझाविरुद्ध शारापोव्हाला संधी साधता आली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button