breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“फॉर्म 17′ भरण्यास सोमवारपासून सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म क्रमांक 17 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (दि.30) अर्ज करता येणार असून, त्याची शेवटची मुदत 25 ऑगस्टपर्यंत राहणार आहे.

दहावी व बारावीच्या फॉर्म क्रमांक 17 द्वारे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 30 जुलै ते 25 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज कागदपत्रासह संपर्क केंद्र शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात दि. 27 ऑगस्टपर्यंत सादर करावे लागेल. शाळांनी दि.31 ऑगस्ट रोजी संबंधित विभागीय बोर्डाकडे अर्ज जमा करावेत, असे राज्य शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

फॉर्म नंबर 17 भरत असताना दहावीसाठी नोंदणी शुल्क एक हजार आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क राहील. बारावीसाठी शुल्क पाचशे रुपये आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क भरणे आवश्‍यक आहे. अधिक माहिती बोर्डाच्या संकेतस्थळावर तपशीलवार प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्या सूचना पाहून विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button