breaking-newsआंतरराष्टीय

फेसबुकवरील लोकप्रियतेत मोदी सर्वांत आघाडीवर

डोनाल्ड ट्रम्प यांनाही टाकले खूप मागे 
जीनिव्हा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवरील लोकप्रियतेच्या बाबतीत इतर जागतिक नेत्यांपेक्षा आघाडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्यांनी खूप मागे टाकले आहे. वर्ल्ड लिडर्स ऑन फेसबुक या नावाने एक पाहणी अहवाल आज प्रसिद्ध झाला. त्यानुसार लोकप्रियतेबाबत सर्वांत आघाडीवर असणाऱ्या मोदींचे तब्बल 4 कोटी 32 लाख 49 हजार 278 इतके फॉलोअर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ट्रम्प यांच्या फॉलोअर्सची संख्या मोदींच्या फॉलोअर्सपेक्षा जवळपास निम्म्याने कमी आहे.

जगभरातील 650 नेत्यांच्या फेसबुक पेजेसचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला. दरम्यान, फेसबुक पेजवरील इंटरऍक्‍शन्सबाबत ट्रम्प जगातील इतर नेत्यांपेक्षा खूूप पुढे आहेत. मागील 14 महिन्यांत ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवर 20 कोटींपेक्षा अधिक इंटरऍक्‍शन्स (कॉमेंटस्‌, लाईक्‍स आणि शेअर्स) झाल्या. तर मोदींच्या फेसबुक पेजवरील इंटरऍक्‍शन्सची संख्या 11 कोटींपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, 2017 मध्ये सर्वांधिक लाईक्‍स मिळवणारी पाचही छायाचित्रे मोदींनी पोस्ट केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button