breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरीवाले, कामगार यांच्या हितासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न

– अध्यक्ष काशिनाथ नखाते यांची माहिती

– पालकमंत्री अजित पवार, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, गायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत घोषणा

पिंपरी ! प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरात फेरीवाले, पथारीवाले, कष्टकरी कामगार यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशीनाथ नखाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून फेरीवाल्यांचे , कामगारांचे प्रश्न सोडवू, असा निर्धार त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री अजित पवार यांची नखाते यांनी भेट घेतली. या वेळी पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, स्वीकृत नगरसेवक राजेश वाबळे यांच्या उपस्थितीत संलग्न झाल्याची घोषणा करण्यात आली.

नखाते यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले की, गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाले, पथारीवाले, कष्टकरी कामगार, घरेलू महिला कामगार, बांधकाम कामगार यांच्या प्रश्नासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ झगडत आहे. त्यासाठी पिंपरीसह राज्यभर निवेदने दिली. आंदोलन करण्यात आली. कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी, उतारवयात पेन्शन मिळावी, स्वस्त घरकुल मिळावे, त्यासाठी कायदे व्हावेत यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली येथे आंदोलन केली. महासंघाच्या माध्यमातून 10 हजार बांधकाम कामगारांची शासनाकडे नोंद करून त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. फेरीवाले, हातगाडी, पथारीवाले अशा 10 हजार विक्रेत्यांचे सर्वेक्षण महापालिकेने केले आहे. सहा हजार परवाने दिले आहेत. सहा काही प्रश्न सुटले. काही प्रश्नांना शासकीय पातळीवर न्याय दिला जात न्हवता. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. पिंपरी चिंचवड मध्ये फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात वाढ झाली आहे.
या मुळे अनेक फेरीवाले बेरोजगार झाले असून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दाद दिली नाही.

त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्नित काम करण्याचा निर्णय संघटनेतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे फेरीवाल्यांसह, कष्टकरी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर ताकद मिळेल. कार्यकर्त्यांच्या या भावना लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न राहून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नखाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. राज्यभरात महासंघाचे २१ हजार सभासद नोंदणी झाली आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

प्रतिक्रिया –
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संलग्न राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे पक्षाच्या माध्यमातून दाद मागून न्याय देण्याचा पर्यन्त करणार.

– काशीनाथ नखाते, अध्यक्ष.
कष्टकरी संघर्ष महासंघ.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button