breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेरनिवड झाल्याबद्दल अॅड. सचिन पटवर्धन यांचा शहर भाजपतर्फे सत्कार

 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे नेते अॅड. सचिन पटवर्धन यांची राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल अॅड. सचिन पटवर्धन यांचा प्रदेश भाजपा आणि पिंपरी-चिंचवड भाजपच्या पदाधिका-यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुरेश हळवणकर, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकरीणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button