breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रियविदर्भ

फेक फेसबुक अकाऊंटवरून अमृता फडणवीसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेस ठाण्यातून अटक

ठाणे । महान्यूज। विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर शिवागाळ केल्याप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे. फेक फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून ही महिला अमृता फडणवीसांना शिवीगाळ करत होती. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने ठाण्यातील एका महिलेला अटक केली आहे. स्मृती पांचाळ असं या महिलेचं नाव आहे. तिच्याविरोधात आयपीसी आणि आयटी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर नावाने एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले होते. ज्य़ामाध्यमातून ती अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत होती. तसेच ती आपल्या वॉलवर अमृता फडणवीसांविरोधात अपमानास्पद पोस्ट टाकल्या होत्या. याप्रकरणी संबंधित आरोपी महिलेला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button