breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फायनान्स कंपन्या विरोधात लढा उभारू : बाबा कांबळे

रिक्षा मालक, टेम्पो, बस, ट्रक, मालक यांच्यासाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र सुरू

पुणे| प्रतिनिधी

रिक्षा चालक , टेम्पो ,बस ,ट्रक , कॅब  मालकांसह सर्व वाहतूक दारांचे प्रश्न कोरोनामुळे बिकट झाले आहेत. कोरोनामुळे आठ ते दहा महिना हा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. या मुळे कर्जाचा डोंगर वाढला असून बँक आणि फायनान्सचे हप्ते थकले आहेत. फायनान्स कंपन्या वाहतूकदारांना त्रास द्वत आहेत. त्यामुळे आगामी काळात फायनान्स कंपन्या विरोधात लढा उभारू असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

वाचा :-राज्यात वाढला थंडीचा कडाका

फायनान्स कंपन्यांचा त्रास सहन न करता रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस कॅब आणि सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी एकत्र येऊन संघर्ष करावा, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि वाहतूक पंचायतीच्या वतीने केले होते. त्याबाबत पिंपरी येथे रिक्षा, टेम्पो, कॅब , ट्रक, बस  चालकांची बैठक आयोजित केली होती. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. या वेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, फायनान्सच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार या प्रश्ना वरती गप्प आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये महत्त्वाचे योगदान देणारे सर्व प्रकारचे वाहतूकदार यांना मदत करण्यास सरकार तयार नाही. केंद्र सरकारने कोविड 19 साठी वीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. परंतु रिक्षा, टेम्पो, बस, ट्रक, कॅब मालक चालक यांना मात्र कोणताही लाभ झाला नाही. स्वबळावर सन्मानाने जीवन जगणारे हे घटक अडचणी मध्ये आहे. निराश आणि त्रास सहन करत जीवन जगत आहे. पंचायत वतीने रिक्षा, टेम्पो, कॅब, बस, ट्रक चालकमालक यांच्यासाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले.

या ठिकाणी सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत पंचायत सल्लागार अ‍ॅड. दिलीप शिंगोटे हे उपलब्ध असणार आहेत. ज्यांना फायनान्स कंपन्यांचा त्रास होत आहे. त्यांनी योग्य ते कागदपत्र घेऊन वरील ठिकाणी येऊन भेटावे. मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचा लाभ रिक्षा टेम्पो, बस, ट्रक, कॅब चालक मालकांनी घ्यावा, असे आवाहन देखील बाबा कांबळे यांनी केले.

………………………………..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button