breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘फसवी कर्जमाफी’ शेतकऱ्याने लावला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा फ्लेक्स…

बुलढाणा – महाराष्ट्रात सरकार कोणाचही असो शेतकऱ्यांचा मुद्दा हा प्रत्येक पक्षाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.शेतकऱ्यांना अनेक आश्वासन आणि अनेक वचनं दिली जातात परंतु त्याचं गोष्टी जेव्हा पुर्ण होतं नाहीत तेव्हा हे शेतकरी या राजकारण्यांचे वाभाडे काढल्याशिवाय राहत नाहीत.फडणवीस आणि ठाकरे सरकराने कर्जमाफी घोषित करूनही कर्जमाफी न मिळाल्याने एका शेतकऱ्याने चक्क या दोन्ही नेत्यांचा फ्लेक्स लावून फसवी कर्जमाफी असे लिहीले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील निळकंठ लिप्ते या शेतकऱ्याने चक्क त्याच्या शेतात माजी मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री या दोघांचे फोटोचा फलक लावून फसवी कर्जमाफी अशा प्रकारचे मजकूर टाकून फलक लावला आहे . या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती असून त्याने 2011 मध्ये पीक कर्ज घेतले होते.2015 पर्यत रेगुलर कर्ज भरले मात्र 2015 च्या नंतर ते थकीत झाले. यामध्ये 147000 हजार रुपये एवढे पीक कर्ज त्या शेतकऱ्याकडे राहिले होते त्यातील महायुतीच्या सरकार ने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधून या शेतकऱ्यांचे फक्त 47000 हजार रुपये कर्ज माफ झाले. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफी केली त्या कर्जमाफी मध्ये त्या शेतकऱ्याचे फक्त 28000 हजार रुपये इतके कर्ज माफ झाले असून आता शेतकरी बँकेत गेला असता त्याने बँक विचारले असता 74000 हजार रुपये अजून बाकी असल्याचे बँक मॅनेजरने सांगितले त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या चक्क आपल्या शेतात आजी व माजी मुख्यमंत्री याचे फोटो चे फसवी कर्जमाफी अशा प्रकारचे फलक लावला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button