breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘फडणवीसांचं ज्ञान दिल्लीला समजलं तर सर्वात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल’, अजित पवारांनी काढला चिमटा

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

सहा वर्षांपूर्वी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प सभागृहात सादर करत असताना सगळे विरोधक आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कोणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळातही माझ्या समोरच्या बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला एअरफोन लावून, बाकावर डोकं ठेवून अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्यातील मुद्दे टिपून ते लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. ते सदस्य हे देवेंद्र फडणवीस होते,” अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.

याच अज इतकं वाईट वाटत होतं की, हे इतकं बारकाईने ऐकतात यांनी थोडसं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत नाही. हे समजून ऐकत होते. तसे तसे मुनगंटीवार जोरजोरात घोषणा देत होते. गिरीश महाजन तर विचारुच नका. मुनगंटीवारांच, गिरीश महाजनांच चाललं होतं. पण त्यांना काय माहिती होतं की, पुढे जाऊन हाच मुख्यमंत्री होणार आहे आणि याच्याच हाताखाली काम करायचं आहे.”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे नुकतंच उद्धाटन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भाजपसह, महाविकासआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान चिमटे काढले.

“हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता असं मला जाणवायला लागलं आहे. त्यामुळे राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नाही, असे मला वाटतं.” असेही अजित पवार म्हणाले.

“आम्हाला पण जरा सुगीचे दिवस येतील. आमचं पण जरा बरं चालेल. भाजप नेते राम नाईक तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितलं की हे साहित्यिक आहेत, यांना बरंच ज्ञान आहे, आता ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करुन घेऊ. तर सर्व आमच्या महाराष्ट्राच्या 288 आणि खालच्या सभागृहाची एकमताने मान्यता राहील. त्यात सर्वात आनंद सुधीर मुनगंटीवार होईल. गळ्याची आण खोटं बोलतं नाही,” असा चिमटाही अजित पवारांनी काढला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button