breaking-newsपुणे

फक्‍त 6 तासांत 33 हजार रुग्णांची तपासणी

  • पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची नोंद लिमका बुकमध्ये

पुणे – फक्‍त 6 तासांमध्ये तब्बल 33 हजार रुग्णांची हिमोग्रामची तपासणी करत पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाने लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. अशा प्रकारे लिमका बुकमध्ये नोंद होणारे पालिकेचे हे पहिलेच रुग्णालय आहे.

अशा प्रकारे पालिकेने पहिल्यांदाच प्रमाणपत्र मिळवले आहे. जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करणे व ऍनेमियाचे रुग्ण शोधणे हा या तपासणीमागचा हेतू होता. यामध्ये किती रुग्णांना खरोखरच ऍनेमिया होता, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, अशा प्रकारे तपासणी मात्र करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडला आहे. भविष्यात अशा प्रकारचे चांगले आरोग्यविषयक प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा.

पालिकेच्या रुग्णालयाने साधारण वर्षभरापूर्वी याच महिन्यात एक शिबीर घेत सहा तासांमध्ये 33 हजार रुग्णांच्या रक्‍ताची तपासणी केली होती. त्यामध्ये त्यांनी रुग्णाला अशक्‍तपणा आहे, की नाही याची पाहणी केली होती. या चाचणी कमला नेहरु रुग्णालयाबरोबर आणखीही काही ठिकाणी झाली. मात्र सहा तासांत इतक्‍या विक्रमी वेळेत रुग्णांची तपासणी करणारे पालिकेचे कमला नेहरू रुग्णालय हे प्रथम ठरले आहे. सहा तासांत 33 हजार याचाच अर्थ एका तासाला 5 हजार 500 रुग्णांची तपासणी झाली होती. पालिकेच्या रुग्णालयांवर आधीच अतिरिक्‍त ताण असताना आहे त्या मनुष्यबळात इतक्‍या मोठ्या प्रमाणातवर रुग्णांची तपासणी करणे ही बाब दखलपात्रच होती. त्यामुळेच लिमका बुकने याची नोंद घेत पालिकेच्या या रुग्णालयाला प्रमाणपत्र देऊ केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button