breaking-newsआंतरराष्टीय

फक्त 12 मिनिटांत पूर्ण इस्रायलला उद्ध्वस्त करू-पाकची धमकी

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ कमांडरने फक्त 12 मिनिटांत इस्रायल या देशाला उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिली आहे. जर इस्रायलने पाकिस्तानच्या जमिनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर यहुदींच्या इस्रायलला 12 मिनिटांत नेस्तनाबूत करू, अशा इशारा पाकिस्तानी जनरल हयात यांनी दिला आहे. मी यहुदीविरोधी नाही. परंतु फलिस्तानी समर्थक आहे. आम्ही इस्रायलला स्वतःचे शत्रू राष्ट्र मानत नाही.

ही मानवाधिकारांची लढाई आहे. पाकिस्तानातही मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होते हे मान्य आहे. परंतु या मुद्द्यावर आम्ही इस्रायलशी कोणतेही संबंध प्रस्थापित करू इच्छित नाही. पाकिस्ताननं प्रतिमा संवर्धनासाठी अंतर्गत काही बदल करणे गरजेचे आहेत. मुस्लिम काऊंसिल रिपोर्टनुसार, इस्रायल पाकिस्तानचा विश्वासघात करत आलाय. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी 1967च्या एका आर्टिकलचाही हवाला दिला होता.

इस्रायलचे संस्थापक डेविड बेन यांच्या मते, पाकिस्तान हा यहुदी लोकांचा राग करतो आणि अरबी लोकांवर प्रेम करतो. अरब देशांचे समर्थक हे अरब देशांहून अधिक खतरनाक आहेत. त्यामुळे यहुदींनी पाकिस्तानविरोधात तात्काळ पाऊल उचललं पाहिजे. परंतु डेविड बेन यांचं हे कथित स्वरूपातील विधान पाकिस्तानी बुद्धिवंतांनी मोडतोड करून मांडल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button