ताज्या घडामोडीपुणे

प्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून भाजपातर्फे कापडी पिशव्या वाटपाचा संकल्प

शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दोन हजार पिशव्यांचे वाटप

पिंपरी – भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरातील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा. रहिवाशांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याची सवय लागावी, या विधायक हेतूने आमदार लक्ष्मण ज़गताप यांनी शहरामध्ये एक लाख कापडी पिशव्या वाटपास सुरुवात केली आहे. गुरूवारी (दि. 5) पिंपळे गुरव भागात सुमारे 2 हजार महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्यावर उपाय सुचवलेला नाही. त्यामुळे चोरून लपून व्यापारी, विक्रेते प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. शहरात खरोखरच प्लॅस्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी रहिवाशांना पर्याय देणे आवश्यक आहे. यासाठी भाजपाने कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रिक्षा वाहनतळ, मॉल्स, दुकाने, बाजारपेठ, बस थांबे, रेल्वे स्थानके या ठिकाणी उभे राहून कार्यकर्ते कापडी पिशव्या वाटप करणार आहेत. या पिशव्यांवर शहर स्वच्छता, पाणी बचत याविषयी घोषवाक्ये लिहिण्यात आली आहेत.

यावेळी शहर प्रवक्ते अमोल थोरात, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटॆ, नगरसेवक शितल शिंदे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक सागर आंगोळकर, नगरसेविका उषाताई मुंडे, विजया ननावरे, सुरेखा सुर्यवंशी, संगीता बामग़ुडॆ, कल्पना शिंदे, संगिता डिखळे, प्रतिभा चव्हाण, स्वाती गुरव, वैशाली घाडगे, माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, सिमा चौगुले आदि उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button