breaking-newsआंतरराष्टीय

प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलच्या मुलासाठी ही नावं चर्चेत

ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना मुलगा झाला. स्थानिक वेळेनुसार ६ मे रोजी पहाटे ५ वाजून २६ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव काय ठेवायचे हे अजून ठरलेले नसले तरीही बुकींमध्ये आर्थर व जेम्स या संभाव्य नावांवर सट्टा लागला आहे.

आर्थर हे नावं ब्रिटनच्या राजघराण्याच्या परंपरेशी जोडलं गेलेलं आहे. राणी विक्टोरियाच्या सातव्या मुलाचं नावही आर्थर हेच होतं आणि हे मूल राणीचं सर्वात लाडकं होतं असंही म्हटलं जातं. ब्रिटनच्या राजघराण्यातील नव्या पाहुण्यासाठी फिलीप आणि अल्बर्ट ही नावंसुद्धा चर्चेत आहेत.

The Royal Family

@RoyalFamily

Her Royal Highness The Duchess of Sussex was safely delivered of a son at 0526hrs.
The baby weighs 7lbs 3oz and The Duke of Sussex was present for the birth.
Read the full announcement here: https://bit.ly/2VMSAVJ 

The Duchess of Sussex has been delivered of a son

Her Royal Highness The Duchess of Sussex was safely delivered of a son at 0526hrs this morning. The baby weighs 7lbs 3oz.  The Duke of Sussex was present for the birth. The Queen, The Duke of…

royal.uk

२३.३ ह लोक याविषयी बोलत आहेत

येत्या एक-दोन दिवसांत चिमुकल्याचं नाव जाहीर करण्यात येणार असल्याचं समजतंय. ‘आम्ही अद्याप मुलाच्या नावाचा विचार करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया प्रिन्स हॅरीने दिली होती.

ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा राणी एलिझाबेथ यांचं सातवं पतवंड ठरलं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये गेल्या वर्षी (१९ मे २०१८ रोजी) झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकडे पुत्र, तर राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button