breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जदयूमधून हकालपट्टी

बिहार | जनता दल यूनायटेड पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात वारंवार वक्तव्य करणाऱ्या जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि महासचिव पवन वर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दोघांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे.

पक्षविरोधी कार्यात सहभाग असल्याचा आरोप करत दोघांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांच्यासंदर्भात काल असे सांगितले होते की, ज्यांना पक्षाची भूमिका पटत नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर पडावे. १५ जानेवारी रोजी सुध्दा नितीश कुमार यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. तर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार चुकीचे वक्तव्य करत आहेत असे सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button