breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रत्येकाने आपले विचार मांडायला शिका – मुक्ता दाभोळकर

पिंपरी – माणसे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यांची मांडणी करतात. त्यांचा प्रतिवाद करता येतो व हीच सामाजिक जीवनाची रीत आहे, असे आपण सर्व जण मानत आलेले आहोत. समाजात बदल होण्याच्या शक्यतांविषयी आपण आशावादी राहण्यासाठी ही वैचारिक मोकळीक खूप गरजेची आहे. प्रत्येकाने आपले विचार मांडायला शिका, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी ताथवडे येथे व्यक्त केले.
ताथवडे येथील जेएसपी कॉलेज येथे नरेंद्र दाभोळकर यांना येत्या 20 ऑगस्टला पाच वर्षे होत आहे. त्यानिमित्त रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने दाभोळकर विचारधारा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी हिंसा के खिलाफ मानवता के ओर या अंगाने विवेकवादावर बोलल्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सचिव बाळकृष्ण खंडागळे,  रो. संजय खानोलकर,  जेएसपीएम कॉलेजचे प्राचार्य आर. के. जैन, अंनिसचे अध्यक्ष मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.
 त्या म्हणाल्या, आपल्याला विचार मांडण्याची मोकळीक असेल किंबहुना विचारांच्या आधारावर हा देश घडवण्याची आपली जबाबदारी असेल, असेच ही सर्व सुधारणावादी मंडळी मानतात. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर या गृहितकालाच सुरुंग लागण्याची भीती निर्माण झालेली आहे.
20 ऑगस्ट 2013 रोजीदोन वर्षापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी डॉ, नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर दीड वर्षाने 16 फेब्रुवारी 2014 ला कॉ. गोविंद पानसरेंवर गोळ्या झाडण्यात आल्या व त्यानंतर सहा महिन्यातच 30 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दुस-या दिवशी प्रा. एम. एम. कलबुर्गी यांची कर्नाटकात धारवाड येथे हत्या करण्यात आली. हे तिन्हीही खून दिवसाढवळ्या करण्यात आले. या तिघांना आडवाटेवर गाठून गुपचूपपणे संपवणे ही या खुनांची पद्धत नव्हती. अन्यथा 19 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोळकर रात्री दोन वाजता बसमधून उतरले व चालत घरी गेले. तेव्हा त्यांचा खून करणे सहजशक्य होते. पण तसे झाले नाही. कारण खून करणा-या लोकांना जनतेला एक विशिष्ठ संदेश द्यायचा आहे तो असा की, विचार कराल तर खबरदार त्यामुळे हे खून दिवसाढवळ्या करण्यात आलेले आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर व त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचे खूनी पकडले जावेत यासाठी आपल्याला दोन वर्षे विवेकी पद्धतीने रस्त्यावर उतरुन सातत्यपूर्ण संघर्ष करावा लागत आहे. तपासाबाबत पोलीस आणि शासनांकडून सातत्याने निराशा पदरी येत आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खुनी ताबडतोब पकडले जाणे गरजेचे आहे. विचार मांडण्याचा हक्क शाबूत राहील याची ग्वाही मिळण्यासाठी ते अत्यावश्यक बनलेले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button