breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पोलिस दलात मोठ्या हालचाली, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

मुंबई: ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झालेली आहे. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागलेली आहे.

नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झालेली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्ण प्रकाश सांभाळणार आहेत. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची बदली झाली आहे. मिलिंद भारंबे यांची मुंबईत गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button