breaking-newsराष्ट्रिय

पोलिसांनी उघड केला एसबीआय क्रेडिट कार्ड घोटाळा

जोधपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रेडिट कार्ड घोटाळा राजस्थान पोलिसांनी उघड केला आहे. जोधपूर पोलिसांनी एका दुकानावर छापा मारून तिथून शेकडो क्रेडिट कार्डस् जप्त केली आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. दुकानातून सिम कार्डस्, स्वाइप मशीन्सही पोलिसांनी जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या माणसाची कसून चौकशी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एसबीआयने आमच्याशी संपर्क करून आम्हाला क्रेडिट कार्डासंदर्भात काही घोटाळा झाल्याचे सांगितले. आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर आम्ही एका दुकानावर छापा मारला. तिथे आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाची क्रेडिट कार्ड मिळाली आहेत. आम्ही या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती डिसीपी कमल सिंग तन्वर यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button