breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलिसांकडून रोडरोमियोंची धरपकड; 24 तरुणांना घेतले ताब्यात

पिंपरी – शहरातील महाविद्यालयांच्या परिसरात घुटमळणा-या रोडरोडमियोंची पिंपरी पोलिसांनी धरपकड केली. महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेश नसताना विनाकारण याठिकाणी फिरणा-या 42 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

पिंपरीतील नवभारत महाविद्यालय आणि प्रतिभा महाविद्यालय या दोन महाविद्यालयांबाहेर ही कारवाई करण्यात आली. नवभारत महाविद्यालयाबाहेर घुटमळणा-या 24 तरुणांना ताब्यात घेतले. तर, प्रतिभा महाविद्यालयाबाहेर फिरणा-या 18 तरुणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

 

शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसताना देखील विनाकारण शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोर तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यासारखे उद्योग या टवाळखोरांकडून केले जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button