breaking-newsराष्ट्रिय

पोटनिवडणुकीतील यशाच्या पुनरावृत्तीसाठी सप प्रयत्नशील

उत्तरप्रदेशात बसपनंतर आता रालोदशी समझोता 
लखनौ – उत्तरप्रदेशात याआधी झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने (सप) बहुजन समाज पक्षाशी (बसप) हातमिळवणी करून भाजपला पराभूत केले. आता त्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशातून सपने आणखी एका पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय लोक दलाशी (रालोद) समझोता केला आहे.

उत्तरप्रदेशच्या कैराना लोकसभा मतदारसंघात आणि नुरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी 28 मे यादिवशी मतदान होईल. या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा सत्तारूढ भाजपला चकवण्याच्या उद्देशातून सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत झालेल्या समझोत्यानुसार कैरानामध्ये सप तर नुरपूरमध्ये रालोद उमेदवार देईल. अर्थात, हा निर्णय अजून जाहीर करण्यात आलेला नाही.

बसपच्या प्रमुख मायावती यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना निर्णयाची माहिती दिली जाईल. त्यानंतरच तो जाहीर केला जाईल, असे समजते. उत्तरप्रदेशात काही दिवसांपूर्वी गोरखपूूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. बसपच्या पाठिंब्यावर त्या दोन्ही जागा जिंकून सपने भाजपला जोरदार राजकीय हादरा दिला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ती पोटनिवडणूक झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button