breaking-newsपुणे
पॉलिश करण्याच्या बहाण्याने तब्बल पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
पॉलिश करण्यासाठी दिलेले तब्बल 1लाख 75 हजारांचे सोन्याचे दागिने हातचालाखीने नजर चुकवून लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.19) दुपारी दोनच्या दरम्यान शनिवार पेठ येथे घडली.
याप्रकरणी सदानंद कंरबेळकर (वय 68, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदानंद कंरबेळकर यांच्या घरी भांडी व सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचे निमित्त बनवून काही अज्ञात इसम आले होते. पॉलिश करण्यासाठी दिलेल्या तब्बल एक लाख 75 हजार सोन्याच्या दागिन्यांची हातचालाखी करून व नजर चुकवून अज्ञात इसमांनी फसवणूक करून
चोरी केली आहे.
याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.