breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पॉर्न स्टार मिया खलिफाचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटायला सुरुवात झाली आहे. जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतातील शेतकरी आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर आता पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिने ‘शेतकरी हत्या थांबवा’ असे लिहिलेला फलक हातात धरलेल्या शेतकरी आंदोलकांचा फोटो ट्विट केला आहे. यासह तिने म्हटलंय, ‘मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. त्यांनी दिल्लीत इंटरनेट सेवा खंडीत केली.’ दरम्यान, रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफाचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यावर जगभरातील लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत.’ तर रिहानाने ‘आपण शेतकरी आंदोलनाबाबत का बोलत नाही?’, असा सवाल उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button