breaking-newsआंतरराष्टीय

पेट्रोल-डिझेल दरवाढ कपातीसाठी जर्मन लोकांचा जालीम उपाय

बर्लिन (जर्मनी) – पेट्रोल-डिझेल दरवाढ कपातीसाठी जर्मन लोकांनी सन 2000 मध्ये एक जालीम उपाय केला होता. त्यांनी केलेल्या जालीम उपायाची आज आठवण करायची वेळ आली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे सतत वाढणारे दर ही एक ज्वलंत समस्या बनलेली आहे भारतात. हे दर दररोज वाढत वाढत गगनाला भिडले आहेत. दर कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सरकार सांगत असते, पण दर काही कमी होत नाहीत.

सन 2000 मध्ये अशीच परिस्थिती जर्मनीत निर्माण झाली होती. प्रचंड वाढणाऱ्या दरांमुळे संतप्त नागरिकांनी एक रामबाण उपाय केला. सर्व लोकांनी आपापली वाहने रस्त्यात आणून उभी केली आणि ते कामावर गेले. बर्लिनमध्ये 5 किमी लांबीची वाहनांची रांग लागली. अनेक तास अशीच परिस्थिती राहिल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. इतर भागातील ट्रक ड्रायव्हर, शेतकरी, टॅक्‍सी ड्रायव्हर आपापली वाहने घेऊन बर्लिनमध्ये आले. त्यांनीही आपली वाहने शहराच्या मध्यवर्ती भागात सोडून दिली. ट्रक ड्रायव्हर्सनी बर्लिन बाहेरचा रस्ता ब्लॉक करून टाकला. सर्वत्र हाच प्रकार घडला.

जनतेच्या या अजब विरोधाने सरकारवर दबाव वाढला. विरोधी पक्षानेही दरवाढ मागे घेण्याची मागणी रेटून धरली. मोर्चे निघाले, धरणे धरले गेले. या एकजूटीच्या विरोधाने अखेर सरकारला इंधनावरील कर मागे घ्यावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button