breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा मुंबईत वाहन विक्रीवर मोठा परिणाम

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतींचा चारचाकी वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. एक ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर दरम्यान मुंबईतील आरटीओ कार्यालयात नव्या वाहनांची नोंदणी २० टक्क्याने घटली आहे. याच काळात प्रति लिटर पेट्रोलच्या दर ७.५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर आठ रुपये वाढ झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी आरटीओमध्ये वाहन नोंदणी ३० टक्क्यांपर्यंत घटली आहे.

पश्चिम उपनगरातील या पट्टयात वांद्रे ते जोगेश्वरीचा भाग येतो. मागच्यावर्षीच्या ऑगस्ट ते ऑक्टोंबरच्या कालावधीशी तुलना करता शहरातील चार आरटीओ कार्यालयात गाडयांची नोंदणी ३ हजाराने कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढत होत्या. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडयात मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये होता. याच काळात प्रति लिटर डिझेलचा दर ८०.१० रुपये होता.

अंधेरी आरटीओमध्ये या काळात १,४०६ गाडयांची नोंद झाली. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात १,६७६ गाडयांची नोंदणी झाली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये २०५९ गाडयांची नोंदणी झाली होती. या सप्टेंबरमध्ये १,२६३ गाडयांची नोंदणी झाली. २०१७ मध्ये अंधेरी आरटीओमध्ये ४,५०७ गाडयांची नोंदणी झाली होती यावर्षी ३,१२३ वाहनांची नोंदणी झाली आहे. जवळपास ३० टक्क्यांनी घट झालीय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button