breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोलची दरवाढ सुरूच; डिझेलचे दर मात्र स्थिर

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती नरम-गरम असल्या तरी भारतात मात्र ऑगस्टचे काही दिवस सोडल्यास पेट्रोलची एकतर्फी दरवाढ सुरूच आहे. आज पेट्रोल ९ ते १० पैसे प्रति लिटर एवढे महागले आहे. विशेष म्हणजे जुलैमध्ये १० वेळा महागलेले डिझेल ऑगस्टमध्ये मात्र स्थिर आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ९ पैसे प्रति लिटर एवढे महागल्यामुळे त्याचा दर ८२ रुपये ३ पैसे झाला आहे. तर डिझेल ७३ रुपये ५६ पैसे आहे. तसेच मुंबईत पेट्रोल १० पैशांनी महागल्यामुळे त्याचा दर ८८ रुपये ६८ पैसे झाला आहे. मुंबईत डिझेल मात्र ८० रुपये ११ पैसे आहे. तर कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोल ९ पैशांनी महागले असून बेंगळुरूमध्ये १० पैसे लिटर एवढे पेट्रोल महागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button