breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पूर्वीच्या भांडणातून तरुणाचे अपहरण; खून करण्याचा प्रयत्न

पुणे – एका तरुणाचे अपहरण करुन त्याचा जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या कवटीला तडा गेला आहे. ही घटना वडगावा बुद्रुक येथील तुकाईनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्योतीबा धोंडीराम खरात (18, रा. सिंहगड रोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यासंदर्भात सविस्तर असे की, फिर्यादी व त्याचा मित्र रविवारी दुपारी गोयल गंगा सोसायटी समोरील कोल्हापूर व्हेज हॉटेलशेजारी ताक प्यायला गेले होते. यावेळी चौघांनी तेथे येऊन त्याला हाताने, पट्ट्याने व बांबूने जबर मारहाण केली. यानंतर त्याचे अपहरण करून त्याला तुकाई टेकडीवरील पाण्याच्या टाकीजवळ नेण्यात आले. तेथे प्रथम त्याला शिवीगाळ करुन संपवून टाकतो अशी धमकी देण्यात आली. यानंतर लोखंडी पाईपने त्याच्या डोक्‍यात मारण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीने काही दिवसांपूर्वी आरोपी राहुल कांबळे याचा भाऊ गणेश कांबळे याच्या हातावर वार केले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. यामुळे त्याने फिर्यादी मित्रासोबत गोयल गंगा सोसायटीजवळ असल्याची खबर मिळताच त्याला गाठले. तेथे त्याला जबर मारहाण करण्यात. यानंतर त्याला जबरदस्तीने गाडीवर बसवून तुकाई टेकडीवर नेण्यात आले. तेथे लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. एम. साळुंखे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button