breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्म्यहत्या प्रकरण! चित्रा वाघ यांनी उघड केले ‘त्या’ मंत्र्याचे नाव

 

मुंबई – बीड परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्म्यहत्ये प्रकरणी एका मंत्र्यावर संशय फिरत होता. मात्र या मंत्र्यांचे नाव सामोरे आले नव्हते. परंतु आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्र्यांचे नाव उघड केले आहे. पूजाच्या आत्महत्येप्रकारणात संजय राठोड यांचे नाव घेण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार वरील दबाव आता वाढण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुण्यात जी पहिली तक्रार दाखल केली तिच मुळात भाजपच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील यांनी केली. त्यानंतर काल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मंत्री संजय राठोड यांचं थेट नाव न घेता ठाकरे सरकार राठोडगिरी कुठपर्यंत सहन करणार असा सवाल केला. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांसमोर येऊन प्रकरणाची पूर्ण चौकशीची मागणी केली. पण यात मंत्री संजय राठोडच असल्याचं नाव घेणं त्यांनी टाळलं. काल सायंकाळी त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचं मागणी करणारं पत्र लिहिलं पण त्यातही त्यांनी संजय राठोड यांचं नाव घेतलं नाही. मात्र रात्री भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री राठोड यांचं नाव घेऊन आरोप केला. वाट कसली बघताय, मुसक्या आवळा असं वाघ म्हणाल्या.

संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत. ते बंजारा समाजातून येतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button