breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुरंदरेना पद्मविभूषण जाहीर झाल्यानं जितेंद्र आव्हाड यांचा संताप, आता ‘महाराष्ट्र पेटवणार’

मुंबई – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरद्वारे संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवर त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘शिवद्रोही ब. मो. पुरंदरेंना पद्मविभुषण जाहिर…. छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट… महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय’. पुढच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र पेटवणार…. परत एकदा…. शिवसन्मान परिषदा घेणार. या ट्विटमध्ये त्यांनी श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांच्या नावे हॅशटॅग केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात ते बोलत आहेत की, ‘महाराष्ट्र भूषण दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय?. जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचं कौतुक केलं होतं. दर दोन-चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना परत जर पडद्यावर अणत असाल, पुरस्काराने गौरवित करणार असाल तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत. याबाबत सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार’.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1089120176270905345

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button