breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली झोपडपट्टीची जागा हडपण्याचा डाव, नागरिकांवर आमदाराचा दबाव !

पिंपरी / महाईन्यूज

झोपडपट्टी प्रकल्प राबविण्याचे अमिष दाखवून नागरिकांकडून शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर संमतीपत्र लिहून घेण्याचा डाव महापालिकेतील अधिका-यांनी आखला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी रात्री अपरात्री झोपडपट्टीतील नागरिकांना उठवून त्यांच्याकडून संमतीपत्र लिहून घेतले जात आहे. यात राष्ट्रवादीच्या आमदारासह, भाजप नगरसेवक आणि बिल्डरचा सहभाग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी केला आहे.

यासंदर्भात परचंडराव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र लिहून घेतले जात आहे. या प्रक्रियेला विरोध करणा-या नागरिकांना धमकावले जात आहे. त्यासाठी झोपडपट्टीतील गुंड्डांची मदत घेतली जात आहे. याच्याशी महापालिकेचा कसलाही संबंध नसताना पालिकेचे नाव वापरून झोपडपट्टी भागातील नागरिकांकडून लिहून घेतले जात आहे.

शासनाने घोषीत केलेल्या झोपडपट्टी भागात खासगी बिल्डरला काडिचा अधिकार नाही. तरी देखील पालिकेचा प्रकल्प असल्याचे खोटे सांगून नागरिकांची फसवणूक करत त्यांच्याकडून संमतीपत्र घेतले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, भाजपचे नगरसेवक आणि बिल्डर यांचा झोपडपट्टीची जागा हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप पांडुरंग सदाशिव परचंडराव यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button