breaking-newsआंतरराष्टीय

पुतीन आणखी सहा वर्षांसाठी रशियाचे अध्यक्ष

  • विरोधकांकडून आंदोलनाची सुरूवात

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे आणखी सहा वर्षांसाठी रशियाचे अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये पुतीन यांना जवळपास 77 टक्के मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या विरोधकांकडून विरोध होण्याची कोणतीही शक्‍यताच नाहिशी झाली. अध्यक्षपदी निवड होण्याची पुतीन यांची ही सलग चौथी वेळ आहे. त्यामुळे दोन दशकांइतका कालावधी ते अध्यक्षपदी कायम रहिले आहेत. स्टॅलिन यांच्यापाठोपाठ इतका दीर्घकाळ अध्यक्षपदावर राहणारे पुतीन हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. पाश्‍चिमात्य देशांबरोबर रशियाचे संबंध ताणलेले असतानाच पुतीन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.

आपल्या चौथ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये देशाचे अर्थकारण सुधारण्याचे आश्‍वासन पुतीन यांनी दिले आहे. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय वादंगांचे आव्हानही त्यांच्या समोर आहे. रशियाच्या वर्तमान काळाबरोबर रशियाचे उज्ज्वल भविष्य हे आपल्या आयुष्याचे ध्येय असेल, असे पुतीन म्हणाले.

क्रेमलिन राजप्रासादातील शपथविधीच्या समारंभाला अनेक क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते. विरोधी नेते अलेक्‍सी नवेल्नी यांनी शनिवारीच देशवासियांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. पुतीन हे झार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या आवाहनानुसार नेवाल्नी यांच्यासह 1.600 आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दडपशाहीचा युरोपिय संघाने निषेध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button