ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यात सशस्त्र दरोडा; टिकावाचे घाव घालून आई-वडिलांसह मुलाची निर्घृण हत्या

दोघे गंभीर जखमी : मावळ तालुक्‍याच्या धामणे गावातील घटना

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – धामणे येथील सशस्त्र दरोड्यात झालेल्या मारहाणीत तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघी गंभीर जखमी झाल्या तर दोघी बहिणी बचावल्याची घटना मंगळवारी (दि. 25) पहाटे दीड ते साडेतीनच्या दरम्यान घडली. पहाटे गाढ झोपत असताना हा दरोडा टाकण्यात आला असून, आजूबाजूला नागरीवस्ती नसल्याने या दरोड्याचा खबर उशिरा कळली. घटनास्थळी नागरिकांची तुफान गर्दी झाली.

नथू विठोबा फाले (वय 65), छबाबाई नथू फाले (वय 60) व अत्रीनंदन उर्फ आबा नथू फाले (वय 35) तिघे रा. धामणे, ता. मावळ जि. पुणे) असे दारोडयातील मारहाणीत मृत्यू झालेल्या वडील, आई व मुलाचे नाव आहे.

तेजश्री अत्रीनंदन फाले (वय 30) व ईश्वरी अत्रीनंदन फाले (वय 2) दोघी रा. धामणे ता. मावळ जि. पुणे असे दरोड्यातील मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आई व मुलीचे नाव आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणे गावच्या हद्दीत शेतीत असलेल्या घरात नथू फाले, छबाबाई फाले, अत्रीनंदन उर्फ आबा फाले हे एका खोलीत झोपले, तर तेजश्री फाले, अंजली फाले (वय 9), अनुश्री फाले (वय 7) व ईश्‍वरी फाले हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. घराचा दरवाजा तोडून अज्ञात दरोडेखोर घरात घुसून गाढ झोपलेल्या फाले कुटुंबियांवर दरोडेखोरांनी लोखंडी रॉड व शस्त्राने वार करून गंभीर मारहाण केली. यात नथू फाले, छबाबाई फाले व अत्रीनंदन फाले यांना डोक्‍यात, पाठीत, पोटात हाता व पायावर गंभीर जखमा झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर तेजश्री फाले व ईश्‍वरी फाले यांना गंभीर जखमा झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्या शुद्धीवर आल्याने जखमी अवस्थेत त्यांच्या शेजारी रत्नाबाई रोहिदास गराडे यांच्याकडे पहाटे साडेचार वाजता येऊन घटना सांगून बेशुद्‌ झाल्या होत्या. रत्नाबाई गराडे यांनी आरडाओरडा करून लगतच्या ग्रामस्थांन जमा करून त्यांच्यावर सोमटणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरोडेखोरांनी भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारुन गंभीर जखमी केले. दरोडेखोरांनी फाले कुटुंबियांचे अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने घेऊन पसार झाले. नथू फाले हे घोरावडेश्‍वर दिंडी समाज संस्थेचे ज्येष्ठ टाळकरी होते. तसेच प्रसिद्ध दुग्धव्यवसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याकडे 35 म्हशींचा गोठा आहे. त्यांचा पांडुरंग नथू फाले हा वाकड (पुणे) येथे राहत आहे. या दरोड्यातून केवळ अंजली व अनुश्री या दोन बहिणी वाचल्या आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक म्हणाले की, दरोडेखोराच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेचे 4 पथके, देहूरोड उपविभागीय कार्यालयाचे 2 तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण 8 पथके रवाना केली आहेत. प्रत्येक गावांनी आपल्या हद्दीतील प्रवेश, चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले. गावातील तरुणांचे ग्राम सुरक्षा दल निर्माण करून त्यांना रात्रगस्त घालण्याचे अधिकार देणार आहे. अशा क्रूर दारोड्यातील टोळ्यांची शोध सुरू केला आहे. 6 ते 7 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचा संशय आहे.

धामणे येथील दरोड्याची गंभीर दखल घेतली असून, दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त केलेली आहेत. मावळातील गुन्हेगारी टोळ्या व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार आहे. मावळातील वाढती गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू करणार आहे. नागरिकांनी तसेच ग्राम रक्षक दलांनी सतर्कतेने पुढाकार घेतल्यास गुन्हेगारीला आळा बसेन.
– विश्‍वास नांगरे पाटील,
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button