breaking-newsपुणे

पुण्यात शिवशाही बस रस्त्यावरच झाली पलटी

पुणे – कोरोना काळातील लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शिवशाही बसला अपघात झाल्याची पहिली घटना घडली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे काल रविवारी रात्री उशिरा शिवशाही एसटी बस रस्त्यावरच पलटी झाली. या भीषण अपघातात १० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त शिवशाही बस ही नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी एका वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा अचानक सुटल्याने शिवशाही बस रस्त्यावर पलटी झाली. या बसमध्ये असणाऱ्या १० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे एक तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिवशाही बसला बाजूला करण्यात यश आले. मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button