breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात मृत्यूचे तांडव, 16 जण ठार, ही आहेत मृतांची नावे

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे 2 वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोर घडली. येथे असलेली भिंत लेबर कॅम्पवर कोसळल्याने अनेक मजूर भिंतीखाली सापडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर अग्निशमन दलाने तत्काळ मदतकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 3 मजुरांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अजूनही मदतकार्य सुरु आहे. याठिकाणी पुणे, हिंजेवाडी आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दलाची पथके आणि एनडीआरएफचे पथक मदत कार्य करत आहे.

कोंढवा बुद्रुकमधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ बिल्डिंगच्या इमारतीची संरक्षण भिंत शेजारी असलेल्या मजुरांच्या शेडवर पडली. कांचन कम्फर्ट या बांधकाम कंपनीकडून मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्यांच्या खोल्या बांधल्या होत्या. या खोल्या संरक्षण भिंतीच्या खालच्या बाजूला खड्ड्यात बांधलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे 2 च्या सुमारास संरक्षण भिंत थेट मजूरांच्या राहण्याच्या ठिकाणी पडल्याने अनेक मजूर त्याखाली सापडले.

आतापर्यंत घटनास्थळावर 15 मजूरांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.

मृतांची नावे

  1. आलोक शर्मा -28 वर्षे
  2. मोहन शर्मा -20 वर्षे
  3. अजय शर्मा -19
  4. अभंग शर्मा -19
  5. रवि शर्मा -19
  6. लक्ष्मीकांत सहानी -33
  7. अवधेत सिंह -32
  8. सुनील सींग -35
  9. ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )
  10. सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )
  11. विमा दास -28
  12. संगीता देवी -26

जखमी

  1. पूजा देवी -28 वर्षे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button