breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन नाही; पण इथून पुढे फक्त या दोन दिवशी लॉकडाऊन घेण्यात येण्याची शक्यता

पुण्यात आज 23 जुलै हा लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. पण उद्यापासून (२४ जुलै) पासून लॉकडाऊन असणार आहे की नाही किंवा काही अटी-नियम लागू होणार आहेत याबबात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

पुण्यातील कोरोनाची स्थिती पाहता काही निर्बंध लागू असणार आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊन घालण्याचा विचार असल्याच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

पुण्यात ४८ व्हेंटीलेटर्स लोकांसाठी उपलब्ध आहेत. पुण्यात बेडची कोणतीही कमतरता नाही असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यातील १० दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्ण संख्या काही दिवसांनी कमी येईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या कालावधीत १ लाखांहून अधिक टेस्ट केल्या आहेत. टेस्ट वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लग्न समारंभात किती लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यायची याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. लग्न समारंभांसाठी आधी ५० व्यक्तींना परवानगी दिली होती, पण आता लग्नासाठी आणखी कमी लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्याचा विचार आहे असं ते म्हणाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घालण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी कोरोना सेंटरमधे आम्ही सीसीटीव्ही बसवणार आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासकीय अधिकार्‍यांनाच पाहण्यासाठीच उपलब्ध असतील. कोरोना सेंटरमधे डॉक्टर येत आहेत का? किती वाजता आणि किती वेळासाठी येत आहेत याची माहिती मिळणं यामुळे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button