breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे – कोरोनामुळे पुणे सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे. सुरेश सीताराम दळवी (वय 50) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सुरेश दळवी हे वाहतूक विभागात नेमणुकीस होते. चतुशृंगी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांना अंगदुखी व अशक्तपणा जाणवल्याने 14 ऑगस्टला त्यांची तपासणी केली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील रुग्णालयात दाखल केले होते. सुरेश दळवी यांच्या पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाली होती.

उपचारानंतर सुरेश यांना 29 ऑगस्टला त्यांना घरी सोडण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. रात्रंदिवस पुणेकरांसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील चौथा बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वी तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढताना दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button