breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील लष्कर भागातील कॅनॉलमध्ये आढळला मृतदेह

पुणे– धारदार शस्त्राने वार करुन एका अज्ञात इसमाचा मृतदेह पुण्यातील लष्कर भागातील कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे आढळून आले. ही घटना सोमवारी (दि.३१) रात्री सातच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती पन्हाळे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सातच्या सुमारास  पुण्यातील लष्कर भागातील कॅम्प एज्युकेशन, कन्या शाळेच्या पाठीमागील बाजुला असलेल्या कॅनॉलमध्ये एका ३० ते ३५ वर्ष वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला. लष्कर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान त्या इसमाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार आढळून आले. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button