breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ‘या’ भागात गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे |महाईन्यूज|

महापालिकेच्या लष्कर व नवीन होळकर पंपिंग येथील पंपींग, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे या ठिकाणाहून होणारा लष्कर भाग, पुणे स्टेशन, नगररोड, लोहगाव आदी भागांमधील पाणीपुरवठा गुरुवारी (दि़. ४ मार्च) पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि़ ५ मार्च) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र – लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी़

नवीन होळकर पंपिंग – विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button