breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ‘करोना’चे तिन्ही संशयित ‘निगेटिव्ह’

पुणे |महाईन्यूज|

दिल्ली प्रवासात उलट्या झालेल्या ‘त्या’ चिनी नागरिकासह तिघांची चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले. पुण्यासह राज्यातील विविध भागांत चीन; तसेच बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

बँकॉकवरून कोलकाता, दिल्लीमार्गे तो चिनी नागरिक पुण्यात आला होता. त्याला दिल्ली प्रवासात उलट्या झाल्या होत्या. त्या उलट्यांमुळे प्रवासी घाबरले होते. त्यामुळे दिल्लीला परतणारे विमान उडायला सात तास उशीर झाला होता. नायडू रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. त्याच्यासह आणखी दोघांना गुरुवारी रात्री दाखल केले होते. त्या तिघांचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला. त्या तिघांची चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याने दिलासा मिळाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ हजार ०८४ प्रवासी तपासले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून १४० प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत आजपर्यंत ३५ जणांना भरती करण्यात आले आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती केलेल्या मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांची चाचणी घेण्यात आली. आजपर्यंत भरती केलेल्या ३५ पैकी ३० जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत. उरलेल्या ५ जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button