breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील एसटीचे 18 “संपकरी’ बडतर्फ

5 जणांचे निलंबन : प्रशासनाची कारवाई

पुणे – वेतनवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी राज्यभरातील 1 हजार 148 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने सेवेतून बडतर्फ केले आहे. यात पुणे विभागातील 18 कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. तर पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दोन दिवस पुकारलेल्या अचानक संपामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दि. 8 ते 9 जूनदरम्यान राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संप पुकारला. त्यामुळे राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची सेवा खंडीत झाली होती. परिणामी, लाखो प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, प्रशासनाच्या माहितीनुसार विविध संघटनांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता संप पुकारल्याने महामंडळाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील बहुतांश एसटी संघटनांनी संपात सहभाग घेतला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यासह विभागातील 13 आगारांतील कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात सहभागी झाले होते. परिणामी, सर्वच आगारांमध्ये असणाऱ्या एक हजार बसेसच्या प्रतिदिन 6 हजार फेऱ्या रद्द झाल्या. दरम्यान, संपकाळात सहभागी नवीन चालक कम वाहक, सहायक व अनुकंपा तत्त्वावर एसटी महामंडळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ समाप्तीच्या सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचे आदेश विभागाने बजावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button