breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या भरवस्तीत आला ८०० किलोचा रानगवा

पुणे | प्रतिनधी

शहर परिसरात वन्य प्राणी येत असल्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र भर वस्तीत सुमारे ८०० किलोचा  रानगवाचं आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.  कोथरूड येथील महात्मा सोसायटीत पहाटे पाचच्या सुमारास हा रानगवा आढळला. वन विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्या चार तास शर्थीच्या प्रयत्नातून बेशुद्ध करून या रानगव्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन राबवत बेशुद्ध करून ताब्यात घेत असताना रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना महात्मा सोसायटीत गवा हा रानटी प्राणी दिसल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नागरिकांनी तातडीने पोलिसांसह अग्निशमन विभागाला कळविले. वन विभागाचे पथक द्खील त्या ठिकाणी दाखल झाले. एनडीएच्या जंगलातून हा रानगवा आलं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असून त्याचे वजन अंदाजे 800 किलो असेल, असा अंदाज आहे.

रानगवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला, बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम झाल्यामुळे रक्त वाहत होते. गळ्यात फास बसल्यामुळे गव्याला दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात होती.

सकाळी साडे नऊच्या सुमारास पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. यामध्ये तीनवेळा डार्ट इंजेक्शन दिल्यानंतर तो इंदिरानगर परिसरात बेशुद्ध पडला. दरम्यान त्याच्या गळ्यात फास लावून पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे गळफास बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघ्यांच्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिस प्रशासन मात्र अपयशी ठरल्याचे दिसून आले.

कोथरुडच्या इंदिरा नगर परिसरात रानगवा बेशुद्ध पडल्यानंतर त्याचे चारही पाय बांधून ताब्यात घेऊन ट्रकमध्ये नेत असताना गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button