breaking-newsपुणे

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या तब्येतीची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याची बातमी कळाल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना फोनद्वारे संपर्क करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्बेतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पुणे शहरात कोरोनाचा हाहाकार सुरू झाल्यापासून महापौर मोहोळ यांनी लक्ष घातले. फिल्डवर जाऊन त्यांनी पुणेकरांची काळजी घेतली. रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम सुरूच असायचे. त्यातून महापौरांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी हळहळ व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा महापौर कोरोना काळात चांगले काम करीत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असताना म्हटले. नुकत्याच झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये महापौर मोहोळ यांनी पुणेकरांना कोरोनाच्या संकटातून बरे करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महापौरांना फोन करून तब्बेतीची विचारपूस केली, आणि लवकर बरे होण्याचे आवाहन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button