breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे हादरलं : वाळू सप्लाय करणा-यावर दिवसाढवळ्या गोळीबार

पुणे – बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करुन खुन केल्याची घटना ताजी असताना सोमवारी वानवडी परिसरात वाळू सप्लाय करणाऱ्यावर गोळीबार करण्यात आला.

मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) याच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना वानवडीतील इनामदार ग्राऊंडच्या शेजारील मोकळ्या जागेत सोमवारी (दि. 12) दुपारी बाराच्या सुमारास घडली. हांडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर हांडे यांचा वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी ते वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन इनामदार ग्राऊंडच्या शेजारी मोकळ्या मैदानात आले होते. यावेळी एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button