breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे सोलापुर महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

पुणे सोलापुर महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

पिंपरी | प्रतिनिधी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून १०० किमी दूर असलेल्या भिगवण गावाजवळ भीषण अपघात झाला. डाळज नं – २ च्या शिवार हद्दीत रविवारी (दि. ७) रोजी मध्यरात्री दोन वाहनात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने या भीषण घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या ट्रकला वेगात आलेल्या फॉर्च्युनरनं पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं असून, फॉर्च्युनर गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात झालेल्या व्यक्तींचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने काढावे लागले. तसंच जखमींना तातडीनं भिगवन आणि पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं आहे .
दरम्यान, भिगवण पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातामुळं कोंडलेली वाहतूक सुरळीत करुन दिली. भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button