breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या प्रवेश परीक्षेसाठी 1 जूनपासून (सोमवार) ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 30 जून आहे.

पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. विद्यापीठात पदव्युत्तर पदवी, पदवी, इंटिग्रेटेड कोर्स असे सुमारे 90 अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विभाग आहेत. या अभ्यासक्रमांसाठी 100 गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात 20 गुण हे सामान्य ज्ञानावर असतात. उर्वरित गुण अभ्यासक्रमाशी निगडीत विषयांवर असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button