breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

पुणे-मुंबई हायपरलूप प्रवासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल

न्यूयॉर्क : पुणे-मुंबई मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे उभारणीच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देत संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डेटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना सेवा अधिक गतीने देता याव्यात, यासाठीही ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे.

व्हर्जिन हायपरलूप लवकरच आपल्या अभियंत्यांचे पथक पुण्याला पाठविणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात १५ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. मुंबई-पुणे अंतर केवळ २० मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी ७० टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ शकणार आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button