breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे, पिंपरी-चिंचवड लॉकडाउनमध्ये औद्योगिक वसाहती सुरू राहणार; आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश

पिंपरी । प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात पुणे व पिंपरी चिंचवडमधील उद्योग आणि आयटी कंपन्या अटी-शर्थींसह सुरूच राहणार, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. याबाबतची नियमावली उद्या जाहीर केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून पुन्हा लॉकडाउन करण्यात येणार आहे. मात्र, या लॉकडाउनमध्ये दोन्ही शहरांमधील औद्योगिक वसाहती सुरू ठेवाव्यात, असा आग्रह
भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शनिवारी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे धरला होता.

लॉकडाउनमधून औद्योगिक कंपन्यांना वगळण्यात यावे. कंपन्या सुरू ठेवण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे केली होती.
त्यासाठी गेल्या तीन महिन्यांनंतर जुलै महिन्याच्या सुरूवातील सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्या पुन्हा दहा दिवस बंद ठेवणे उद्योग आणि कामगारांसाठी हितावह ठरणार नाही, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली होती. याबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेवून निर्णय घेतला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती.
दरम्यान, पुणे विभागीय आयुक्तालय प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाउनदरम्यान दोन्ही शहरांमधील औद्योगिक वसाहती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button