breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपला यश!

पुणे | प्रतिनिधी

पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उमेदवार उभा करुन भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना साद घालत खोत यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. नाराज असलेल्या सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.  आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये रयत क्रांती संघटनेच्या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ही बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये विरोधी महाविकास आघाडीला फायदा होऊ नये, या दृष्टीने भाजपाला मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यासोबत यापुढील काळात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी देत पुणे पदवीधर निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली. त्यानुसार रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी माघार घेतली जाईल, अशी भूमिका बैठकीत जाहीर केली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी रयत क्रांती संघटना भाजपचा एक घटक पक्ष आहे आणि या नात्याने सत्तेत असताना रयत क्रांती संघटनेचा नेहमीच सन्मान राखला गेलेला आहे, असं सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button